Tuesday, September 4, 2007

बोला...

बोला... बोला... बोला... बोला...
कुठल्याही भाषेत बोला...
कुठेही बोला...
भाषेचा आकार नाही
जागेचे बंधन नाही
फ़क्त बोला...१

सल्लुशी बोला...
संजुशी बोला...
सचिनशी बोला...
सौरभशी बोला...
शरदशी बोला...
लालुशी बोला...
दादाशी बोला...
ताईशी बोला...
भाईशी बोला...
अण्णांशी बोला.
..आबांशी बोला...
कोणाशी ही बोला...
फ़क्त तुम्ही बोला...२

बी.एस.एन.एल वरुन बोला...
एअरटेल वरुन बोला...
आयडिया वरुन बोला...
हच वरुन बोला...
टाटा वरुन बोला...
रिलायन्स वरुन बोला...
ते अब्जानी कमवतील
तुम्ही करोडोत बोला...३

आनंदानी बोला...
दु:खात बोला...
सुखात बोला...
निराशेत बोला...
आशेत बोला...
मनातलं बोला...
जनात बोला...
समजुन बोला...
उमजुन बोला...
आता फ़क्त तुम्ही बोला...४

बोला...
बोलात रहा...
आणि बोलतच रहा...!

(चाल: रस्त्याकडेवरील औषध विक्रेते किंवा
क्रान्तीवीर मधील नाना किंवा
रिमिक्स ‘पैचान कौन’ ची सुरवात)

चाहुल: the passport

घरात आज सर्वजण गदबडीत होती. घरामध्ये असेच असते, कोणी गावावरुन आले तरी गडबड आणि कोणी गावी निघाले तरी धावपळ...
तशी नीता फ़ार लांब जाणार नव्हती. फ़क्त एक महिन्यासाठी यु.स.ला जाणार होती. तरी तिने गोधंळ करु नये म्हणुन बाबानी विचारुन घेतले, बाई गं, पासपोर्ट व्यवस्तित ठेवला आहे का? हिने पर्समध्ये पुन्हा एकदा बघितले दोन पासपोर्ट दिसत होते. ‘बाबांचा नविन करकरीत दिसतोय’ हि हळुच पुटपुटली...
नीता घरातील मोठी मुलगी. थोडी टॉमबॉय प्रकारातली. कुलकर्णीना दोन्ही मुली, पण नीतावर फ़ारच जीव लहाणपणापासुन हिला मुलासारखी वागणुक मिळालेली. काही वेळेस धाकटी चिडून म्हणायची एकतर मी सावत्र असेल किवां अनाथालयातुन आणलेली असेल, बाबा नेहमी तुझे लाड करतात. तिला हे कळायचे नाही बाबानीं आणलेल्या कोणत्याही वस्तु मध्ये तिची चांगलीच असायची.
लहाणपणापासुन खेळणे,अभ्यास,कराटे क्लास,डान्स क्लास सर्वबाबतीत निपुन. शाळेत पहिला नंबर कधी सुटला नाही आणि पुढे कॉलेजमध्ये सुध्दा... कॉलेज मध्ये पाच सहाजणाम्चा ग्रुप जमला होता तीन मुले तीन मुली आणि लीडर ही. नीतामध्ये नेतृत्व गुण पहिल्यापासुन असल्यामुळे कॉलेजच्या इतिहासातली पहिली मुलगी सी.आर. म्हणुन निवडुन आली. थोडी ताईगीरी हि होती. पण सर्वामंध्ये मिळुन मिसळुन.
शेवटच्या वर्षाला विकी नावाचा चिकना त्याच्यां कॉलेजमध्ये दाखल झाला. थोडा जास्त हुशार, थोडा जास्त स्मार्ट आणि थोडा जास्त देखना...!थोडक्यात नीतापेक्षा त्याची भाईगीरी वाढणार होती. नीताने स्व:ता त्याची ओळख करुन घेतली. पुढे ग्रुपमध्ये इन्ट्रो करुन दिला. अभ्यासाच्या नावाने शेवटच्या सेमला मुली ग्रुप सोडुन गेल्या, तरी हि सर्वांना पुरुन उरणारी होती.
देखना स्मार्ट असुनसुध्दा विकी मुलीं मध्ये रमणारा नव्हता. या विषयी त्याला छेडले असता तो म्हणाला,‘ मला ही धाकटी बहीण आहे! मी जसा वागेल तशी तिची वागणुक राहिल. त्यामुळे मुलीपासुन दोन हात दुर. घरचा व्यवसाय आहे तो साभांळुनच शिक्षण चालु आहे. पुढे तोच व्यवसाय वाढवयाचा...
आता कॉलेजमध्यल्या मुलांकडे मोबईल हि नीत्याची गोष्ट झाली होती. जोक्स, फ़्लर्ट, सणानिमित्य शुभेच्छा ह्याचे एसेमेस सर्वा मध्ये व्हायचे. नीताथर क्लासरुम मध्ये बसल्याबसल्या सर्वानां एसेमेस करायची, त्यातुन सर मॅडम पण सुटले नव्हते. एखादा एसेमेस आला तर मुलां बरोबर सर पण गालातल्या गालात हसायचे. हिला ह्या गोष्टीची परवानगी होती. कारण अभ्यासात व्यवस्थीत असतील, तर मुले काय करतात याचे सरांना काय?
सेम संपुन गेली होती. आता काय? रिसल्टची प्रतीक्षा. सुट्टीमध्ये दर वर्षी कुठेतरी कॅम्प असायचा. ह्या वेळेस ग्रुपने शहरातच कॅम्प करायचा ठरवला. कॉलेजमध्ये राहयचे आणि वाहतुकी विषयी जनजाग्रूती करायची. सहा दिवसांनी घरी जायचे, पधंरा दिवसां कॅम्प! सर्वजणे कामाला लागली. कोणी घोषवाक्य तयार करत होते, तर कोणीतरी वाहतुक शाखेची परवानगी काढुनआणली पथनाट्याची तयारी करत होते.शेवटच्या रविवारी पथनाट्य ठरले.

रविवारी सुट्टी असुनसुध्दा मुले सध्यांकाळी मॉल मध्ये जमली. खरेदी नतंर स्वदेश बघुन परत रात्री कॅम्प. मॉलमध्ये दगांमस्ती चालली होती. नीताने तिथल्या तिथे विकीला एक छानसा एसेमेस पाठवला. विकीचा मुलीबाबतचे विचार वेगळे असल्याने, चिडुन त्याने रिप्लाय दिला आणि निघुन गेला. स्लायडिगं स्टेपवरुन जाताना नीता वाचत होती...

"तु स्व:ताला जास्त हुशार समजते.
मला मेसेज करु नको,
काही होणार नाही.
मला बोर करु नको,
I HATE THOSE GIRL WHO BOYS MEANS...!


क्षणभर नीताला काही कळलेच नाही. खाली विकी दरवाजातुन जाताना दिसला. मेसेज वाचुन नीताला भोवळच आली. स्टेप्सवरुन पलिकडे जाण्याच्या क्षणार्धात ती घरघळंत खाली पडली. खाली जमिनीवर आल्यावर मुलांनी लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये नेले. डोक्याला मार लागल्यामुळे तिन-चार दिवस बेशुध्द अवस्थेत होती. हॉस्पितलमध्ये सर्वजवळचे नातेवाईक, मित्र, शिक्षक सर्वजण विचारपुस करुन गेले. बाबा तर चारही दिवस नीताजवळ बसुन होते. आईच सर्व बघत होती. रात्री एकच्या सुमारास नीताच्या डोळ्यातुन अश्रु आलेले बाबानी बघितले ती शुध्दीत आली होती.
स्व:ता बाबानी सर्वात महागडा मोबाईल तिला वाददिवसाला प्रेझेन्ट दिला होता. तिच्या हातातला मोबाईल दुर करत तिच्याजवळ गेले, म्हटले,’कशी आहे तब्येत?’ डॉक्टर येवुन सर्व तपासणी करुन गेले. तिला झोपुन दिले.
दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले असता कळले कि कोणत्यातरी मानसीक धक्क्यामुळे तिची वाचा बसली होती, ती बोलु शकणार नव्हती. बाबानां रडूच आले. सदोदित बडबड करणारी, हसणारी, ओरडणारी नीता गप्प झाली, हि कल्पनाच सहन होणारी नव्हती. पायाला फ़्रॅकचर असल्यामुळे व्हीलचेअर बसुन घरी आली. शेवटच्या सेमचा निकाल लागला होता आणि ह्याही वेळी ती पहिली आली होती. स्व:त प्रिन्सीपल घरी आले. सर्व मित्र आणि तिचा ग्रुप आला होता. पण विकी काही आला नाही. ती कोणाकडे चौकशी करु शकत नव्हती.
एक सारखा मोबाईल मडुन तो मेसेज वाचुन रडत होती. स्व:ताला दुषने देत होती कि आपण त्याप्रकारातल्या मुलीमध्ये मोडतो ज्या मुलाच्यां मागे फ़िरतात, पैसा देखण्यावर भाळतात. मुला मध्ये जास्तीत जास्त वेळ असतात. सर्वांना समान समजुन लहानपणापासुन टॉमबॉयची प्रतिमा तिला आज बोचत होती.
सरते शेवटी बाबानी कर्ज उभारुन यु.स.ला जावून उपचार करण्याचा निर्णय घेतला. आज नीता आणि बाबा जाणार होते. गाडी मध्ये रेडिओवर गाणे लागले...

पल पल मेरी याद आयेगी,
भुल ना जाना मुझको,
इस पल को तुम याद रखो!१

साथ चले थे पाने को मजिंल के वास्ते,
क्यों? हो गये युं हमारे जुदा रास्ते,
पा ना सके मजिंल को,
फ़िरभी साथ चले थे, तुम याद रखो!२
इस पल को तुम याद रखो!

ख्वाब जो देखे तुमने,
वोही तो देखे थे हमने,
जो तुट गये उनको भुल जाओ,
पर ख्वाब देखना,तुम याध रखो!३
इस पल को तुम याद रखो!

वो जागी थी राते,वो मुलाकाते,
वो प्यारी बाते,
वो कसमे, वो वादे,
जो थोड दिये सारे,
पर उस बातो को,तुम याद रखो!!!
इस पल को तुम याद रखो!

विमानतळावर सर्वजण आले होते. सर्वांशी हस्तोदलन करुन, आल्यावर ’बडबडीचे’ आश्वासन नीताने सर्वांना दिले. तिची नजर एक सारखी विकीला शोधत होती. बाबांनी पुन्हा पासपोर्टची आठवण केली. आता तर ती चिडली, दोन्ही पासपोर्ट तिने हातात दाखविले. सर्वांना बाय करुन व्हीलचेअर वरुन जाऊ लागली. जाता जाता विकीला एसेमेस करावा म्हणुन तिने मोबाईल हातात घेतला.एका वळनावरुन जाताना नीताला काचेमागे टाटा करताना बाबा दिसले. तिला कोणाचीतरी "चाहुल" लागली,मग व्हीलचेअर कोण ढकलते आहे म्हणुन बघितले तरमागे विकी होता. पर्समध्ये कोराकरकरीत पासपोर्टविकीचा होता.
आता तिला कळाले बाबा सारखे पासपोर्ट बघ का म्हणत होते. विकी आणि बाबाचे बोलणे झाले होते. पुन्हा एकदा नीताच्या डोळ्यात अश्रु आले. ...आणि मोबाईलवर विकीचा मेसेज आला होता,
:-> :-> :-> :-> :-> :-> :-> :-> :->

तुझ्या ओठी माझे हास्य असावे
माझया डोळ्यात तुझे अश्रु असावे...!

सुखा मध्ये एकरुप व्हावे,
दु:खा मध्ये एकजीव व्हावे.!1

जीवनात विसाव्याचे

दोन क्षण असावे,
ते हि तुझ्या सोबतीत असावे..!२

डोळ्याचीं भाषा डोळ्यानां समजते,
तुझे स्वप्न मला हि दिसते,
ते साकारण्यात यश यावे...!३

तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा
प्रयन्तासाठी दहा ही दिशा,
एका दिशेत मी हि असावे....!4

तुझ्या ओठी

माझे हास्य असावे
माझ्या डोळ्यात
तुझे अश्रु असावे...!