Friday, October 12, 2007

मनस्वामीनी

वैदर्भीय जन्मभुमी
पुण्य वासिनी
स्मरतो तिला प्रत्येक क्षणी
रुप तिचे लोभसवाणी
सुंदर लोचनी
जगताची नारायणी
माझी मनस्वामीनी! १

रुपगर्विता मोहकदेहा,
साष्टांग तुला बघताच समया
डौल चालीची तु मॄगया
स्तब्ध झाली माझी काया!!२

तुच रती तुच मेनका
सौंदर्याची तु ऐश्वर्या
पावन हो तु आता
भक्त मी तुझा केविलवाणा
दया कर ये करुणा करा !!!३

Sunday, October 7, 2007

मुन्ना the real deva

मुन्ना दि रिअल देवा
टायट्ल वाचल्यावर वाटत असेल कि एखाद्या हिन्दी पिक्चर तर नाही। पण नाही हि गोष्ट आहे एका खऱ्या खुऱ्या मुन्नाची आणि त्याच्या प्रेमाची... खरं म्हणजे माझी त्याची ओळख कशी झाली किंवा कशी पटली मला आठवत नाही. तो माझ्या वयाचा, घर जवळच असल्यामुळे घरच्यांची ओळख नतंर शालेय मैत्री आणि जीवनात दोस्ती...

त्याची लक्षणं वेगळी कपडे टि शर्ट तेही दुबईवरुन आणलेली, काकाबरोबर चित्रपट पाहणे, शाळेत गॅदरिगं दरवर्षी भाग घे, वकृत्व स्पर्धा, समुहगान, खेळ नाही-नाही ते सर्व काही. खरं तर चौथीपर्यतं याला "र" सुद्धा उच्चारता येत नव्हते. पण बोबड्या बोलण्यानी त्याची स्टेज डेअरिग कमी झाली नव्हती. आणि हो आमची एक मैत्रीण होती. प्रीति! आम्ही तिघंचौघ एकत्र शाळेत जात होतो, अभ्यास,शाळा,खेळ,भाडणं सर्व एकत्र. बालपण संपल आणि आता दहावी... अभ्यास जोरावर. प्रीति आणि मी एकत्र अभ्यास करायचो, पण हा स्टेज शो, स्पर्धा,आर.एस.पी सर्व काही पण अभ्यास काही नाही. एकदा मी आणि प्रीतिने त्याला फ़ैलावर घेतल पैजं लावली त्याला म्हटंल ७०% मार्क मिळवायचे, पठठया म्हणाला बोनस म्हणून तुमच्या दोघांचे दोन टक्के जास्तीचे आणतो. आणि खरंच त्याला ७२%, मला ८४% आणि प्रीतिला ८५%.

सुट्टीत आराम झाला होता, सर्व ठीक चाललं होते. हा कोणच्यातरी लग्नाला जाऊन आला आणि माझ्या पुढ्यात येऊन म्हणाला मला प्रीतिशी लग्न करायचे आहे.

मी म्हटलं आपल वय काय, शिक्षण, करिअर पुढे आयुष्य पडल आहे ते बघायच की हे खुळ। तो जिद्दिला पेटला म्हणुन मी म्हटलं," १२वी करु मग काय ते बघु. हा त्याला पण तयार. यथा अवकाश १२वी झाली. तिघं १२वी सायन्स झालो. प्रीतिला ८२% मला ८०% ह्याला मात्र ७२%.

आम्ही कोणी इंजिनीअरिगम, कोणी मेडिकल, कोणी बी.एस्सीचे फ़ॉ‘र्म आणले. ह्या बहाद्दराने अपॉइन्टमेन्ट लेटर आणले, म्हटला," मला शिक्षणाचा कटांळा, कामाला लागतो. तसा हा जात्याचा हुशार, पण आळशी आहो काही लिहायचे झाले तरी अक्षर म्हणजे... या बाबतीत गाधींजीच माझं सख्य आहे. सत्य, आहिसां प्रिय आणि दोघाचं अक्षर सारखं. मी म्ह्टलं निदान डिप्लोमा तरी कर, पुढे नौकरी तरी मिळेल. पण नाही, जिद्दि म्हणाला," दोन वर्षे नौकरी लगेच छोकरी..." मी आणि प्रीतिने इजीनिअरिगला प्रवेश घेतला. प्रीतिचे २ वर्ष चांगले गेले, पण ३ वर्षी पैशाचा प्रश्न आला. वडिलांना रिटायरमेन्ट घ्यावी लागली होती त्याला २ वर्ष झाली होती. पुढच शिक्षण होईल का नाही? अशी शक्यता निर्माण झाली. पण तो प्रश्न सुटला....

आणि ह्याचे चागंल्या कपंनीत ट्रेनिगं झाले, नोकरी झाली पण काम कराव वाटलं म्हणुन पुढे ओळखीने वर्कशॉपमध्ये पार्टनरशीपने सुरु केली. चागंला कमवता झाला - गाडीमध्ये फ़िरायला लागला. कधी प्रीतिला पण घेऊन यायचा. आता आम्ही ४ वर्षाला होतो. एकदा चेष्टेने त्याला म्हटले, " ६ वर्षापुर्वी बोलला ते विसरला का ? तर सेन्टीमेन्टल होऊन म्हटलां,

"स्वत:च्या स्वप्नासाठी सर्व जगतात, दुसऱ्याच्या स्वप्नासाठी जगण्याची मजा काही और आहे..."

मला काही कळले नाही। नेहमी कोड्यात बोलायची सवय होती. कधी म्हणायचा माझी जी असेल, तिच रुप कसे का असेना पण डोळे स्वप्नाळु असतील. आणि नाव माझ्या नावातचं तिच नाव असेल. म्हटल हो बाबा हो...

इजीनिअरिग झाले, आता नौकरी! ह्याला म्हटलो तर ३-४ कपनींचे फ़ॉर्म ठेवले. प्रीतिला म्ह्टला, "चागल्यां सॉफ़्टवेअर क्षेत्रात जा. योगायोगाने मी आणि प्रीति एकाच ठिकाणी, सॉफ़्टवेअर डेव्हलपमेन्ट. एकदा ह्याला सायबर कॅफ़ेमध्ये घेऊन गेलो. ई-मेल आय.डी काडून दिला. तिघं एकमेकाना मेल करायचो. एक वर्षचे ट्रेनिगं सपंले. आता पुढे काय? प्रीति म्हटली ’पुढे शिकायचे’ मी म्हटलं ’आता नौकरी.’ ह्याचा धदां पण वाढला. पण अचानक म्हटलां,’ तुम्ही लोकानीं कॉलेज लाईफ़ इन्जॉय केले मी पण करणार. पार्टटाईमचा फ़ॉर्म हजर १ ऑगस्टला सुरु.

प्रीतिला कपंनीने प्रायोजक केले २ वर्ष जर्मनीला जायची संधी मिळणार होती. फ़क्त जायची आणि तिथं राहयची सोय करायची होती. ह्याने एक दिवस पासपोर्ट फ़ॉर्म आणले. तिघांनी ते भरले. त्याला विचारले,’त्याला काय करायचा पासपोर्ट. मी फ़िरायला जाणार. जिद्दी होताच तो. पण एका झटक्यात सर्व धंदा आवरला आणि कॉलेजला जाऊ लागला. प्रीतिची जायची वेळ झाली, आम्ही तिघं तिचे आई-वडिल मुंबईला गेलो. तिला एकटीला निरोप दिला. मला कॉफ़ी हाऊस मध्ये नेले म्हटलां,’बघ, तुला चॉकलेट दिले. मला नाही दिले आणि मी पण आईसक्रिम नाही दिले.’ मी म्हटले,’ लॉजिक सागं.’

" आपल्याला ज्याच्यापासुन वेगळे होवयाचे नसते, त्याला चॉकलेट- आईसक्रिम देत नाहीत."

आणि खरचं त्यानं प्रीतिने चॉकलेट आईसक्रिम खाल्ल नव्हते...

वर्ष सरलम. प्रीति एकदा येऊन गेली. दहा दिवस ढमाल केली. पुन्हा तिला सोडायला गेलो,पण यावेळेस प्रीतिचा मुड वेगळा होता. मला वाटलं पुन्हा जाव लागत आहे म्हणुन वाईट वाटत असेल. आमचे मेल चालुच होते. हा इंटरनॅशनल कॉल लावायचा. आणि हो ई-मेल पण बघायचा.

...आणि एक दिवस. आयुष्यातला तो दिवस मी कधी विसरणार नाही. आपल्याला वाटतं असतं कि एखाद्या बददल सर्व माहिती आहे, पण खरचं आपल्याला सर्व माहिती नसते.

मी आपला नेहमीप्रमाणे ई-मेल पाहत होतो. प्रीतिचा मेल आला, वाचू लागलो, आज मात्र शब्दांचे अर्थ काही करून लागत नव्ह्ते.

मेलमध्ये प्रीतिने सविस्तर अगदी सर्व सगळं लिहिले होते. अगदी दहावी, बारावी, कॉलेज, कपनीं, जर्मनीला जाणे सर्व काही.

दहावीला मला जेव्हा हा म्हटला होता, त्या दिवशी तिला विचारलं होते. तेव्हा चेष्टेने प्रीति नतंर बघु म्हटली होती.

बारावीला पुन्हा ह्याने विचारलं ती म्हणाली,’मला दोन्ही वर्षी चागंले मार्क आहेत. मी आयुष्यात काही करु इच्छिते.’

हा म्हटला,’दोघं करियर निवडु, पण नेमकी तिच्या वडिलांची रिटायर्डमेन्ट झाली. याने परस्पर नौकरीचा निर्णय घेतला. ह्याला माहिती होते दोन वर्षासाठी फ़िची रक्कम उपलब्ध आहे. पुन्हा तिच्या शिक्षणाला मदत करायची आणि हे तिला मान्य होते. तिचं पुर्ण शिक्षण, कपंनीमधले ट्रेनिगं, पासपोर्ट, जर्मनीमधला दोन वर्षाचा खर्च याने पार्टनरशीप तोडुन पैसा उभा केला होता. फ़क्त एक कारणासाठी ‘ स्वप्नाळू डोळे‘

पण नियतीचा डाव काही वेगळा होता. प्रीतिचा एक सिनीयर एक वर्षानतंर जर्मनीला जाऊन मिळाला. दोघाचं प्रेम जमलं.....

येथे हा या विश्वासावर, कि ती वापस येईल। आपल शिक्षण पुर्ण होईल आणि नविन आयुष्य सुरु करता यईल...

प्रीतिने ई-मेल मध्ये लिहीले होते कि जर्मनीतील कपंनीने त्यांना तिथे ऑफ़र दिली आणि तिकडचं ते दोघं राहणार होते. एकदा आईला घेऊन जायला फ़क्त येणार आहे.

फ़्लाईटची वेळ झाली होती, पण प्रीति आली नाही. त्याचं मुंबईत काही काम होते, त्यामुळे आम्ही दोघं दोन दिवस थांबलो आणि वापस आलो. तर मला धक्काच बसला. प्रीति येऊन गेली होती, दोन दिवस राहिली आमची विचारपुस केली. मी म्ह्टलं कि ह्याच्या मोबईलवर फ़ोन का नाही केला? ती आता निघुन गेली होती पुन्हा न येण्यासाठी...

मला आता कळेना ह्याच्यासमोर विषय कसा काढावा? तर हा निवातं. मला एक दिवस कॉफ़ी प्यायला घेऊन गेला. हातात कागद दिला, बघतो तर मला आलेल्या प्रीतिच्या ई-मेलची कॉपी. मी तर चक्रावलो.

त्याला विचारले,’ तुझ्याजवळ कशी काय?’ त्याने खाली दाखवले कि प्रीतिने सी.सी. मध्ये त्याला केला होता. ती विसरली होती, नेहमीप्रमाणे मेल केला गेला होता.

आता तो जे सागंत होता ते धक्कादायक होते, मला मुद्दाम विमानतळावर उशीरा नेलं होते. दोन दिवस थांबुन मला पुढे पाठवले होते आणि स्वत: प्रीतिला जाताना पाहत राहिला...

कधी कधी जातो एअरपोर्टवर, पण प्रीति काय येणार नाही हे माहिती असून...
आणि त्याच खरं नाव सागांयच ,

"प्रतिक-प्रीति"

त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या नावात तिचं नाव होते, पण नशीबात नव्हती...!’
देवाजवळ एकचं मागणं आहे, ’ह्याला स्वप्नाळू डोळ्याचीं मिळु दे। ह्याच कल्याण होऊ दे......

Tuesday, September 11, 2007

याद तो आयेगी...!

अतिंम पथ पे चलने से पहले,
याद तो आयेगी तुम्हे भुलने से पहले!

वो गली, वो चौराहो को,
वो कली, उन बहारों को,
सजोंये थे जो ख्वाबो को,
उन सबको तुटने से पहले!!१
याद तो आयेगी...

मिलके जो खाई थी उन कसमो को,
साथ निभानेवाले हर रिश्तों को,
छोडके जाओगी जब तुम हम सबको,
मुडके देखोगी हमे आगे जाने से पहले!२
याद तो आयेगी...

साथ बिताये उन लम्हो को।
गम के उन पलो को,
दो आंसु झलकेगें गालो पे,
आने वाली खुशी से पहले,
हर कली के खिलने से पहले!३


अतिंम पथ पे चलने से पहले,
याद तो आयेगी तुम्हे भुलने से पहले!

Thursday, September 6, 2007

न समजे...!

न समजे तुला
न समजे मला
हे प्रेम झाले
कधी कुणा...!1

बावरणे कधी
हसने कधी
मध्येच कधी
सावरने कधी
न कळले मला
न कळले तुला
हे प्रेम झाले
कधी कुणा...!२

सहज निरागस
नयन तुझे
शमवी ना
माझी मृगतृष्णा
ना उमजे मला
ना उमजे तुला
हे प्रेम झाले
कधी कुणा...!

ॠतु हिरवा
हवेत गारवा
एक तुझा
सहवास हवा
न जमले तुला
न जमले मला
हे प्रेम झाले
कधी कुणा...!४

हाय रे मेरी किस्मत...!

हाय रे मेरी किस्मत
उसने पलट के भी नहि देखा...!

टि-शर्ट उतार के देखा,
धोती पहन के देखापर हाय..!१!

गॉगल पहन के देखा,
चष्मा उतार के देखापर हाय..!२!

पढाई कर के देखा,
फ़ेल होके देखापर हाय..!३!

झुल्फ़े बढाके देखा,
मुँछ मुंडाके देखापर हाय..!४!

सायकल चलाके देखा,
गाडी मे बैठ कर देखापर हाय..!५!

पलके झुकाके देखा,
नजर उठाके देखापर हाय..!६!

फ़िर मैंने दुसरी को देखा,
पर हाय रे मेरी किस्मत,
उसने अब के बार देखा,
एक नहि बार बार देखा,
बार बार नहि लगातार देखा
और कहा,
"तुमने दुसरी को क्यों देखा?"
अब यह आलम हे,
हम एक दुजे को देखते हे!
और दुनिया हमे देखती है...