Wednesday, August 29, 2007

लफ़डं

देवळातल्या देवाला दगडाचं तुकडं म्हणतील,
म्या प्रेम केलं तर लोक लफ़डं म्हणतील॥

अभी-ऍशने केलं तर कौतुक करतील,
अमीरने केलं तर परवानगी देतील,
सचिन ने केले तर छान म्हणतील,
पण म्या केलं तर व्यभिचार म्हणतील...१

अण्णानि केल तर ’समाजकारण’ म्हणतील,
आबांनी केल तर ‘राजकारण’ म्हणतील,
दादा-भाईनी केला तर ‘कारभार’ म्हणतील,
बाबानी केल तर ‘गांधीगीरी’ म्हणतील,
पण म्या काय करायचं म्हटल तर ‘ह्या’ करतील...

दिल्लीवरुन आलं तर ’हाय-कमांड’ म्हणतील,
मुंबईवरुन आला तर ’आदेश’ म्हणतील,
नागपुरवरुन आला तर ’दक्ष’ होतील,
अव पुर्वेवरुन आला तर ’लाल सलाम’ करतील,
पण म्या काय म्ह्टंल तर ‘गप्प-बस’ म्हणतील॥३