Wednesday, August 8, 2007

जुलूस: THE APPOINTMENT

आज चौकातील सिग्नलवर गर्दी जास्तच होती। सी.ओ.ई.पी. गेटपर्यत वाहनाच्यां रागां आल्या होत्या. राहुलची नजर गेटवर गेली, हलकीशी स्मितरेषा चेहऱ्यावर झळकली. कारण, पहिल्यांदा आणि शेवटी तिला पाहताना, तिचा चेहरा असाच हास्यात बुडालेला होता. त्याला समजले नव्हते कि चेहरा हा कशामुळे हसरा आहे, गालावर पडलेल्या खळीमुळे का डोळ्यातल्या निरागस भावामुळे. काही वेळा तिचा विषय निघाला कि सागांयचा ती तोडांने कमी डोळ्याने जास्त बोलते. तिच्र नाव होते प्रिया... इजींनियरीग संपल्यानतंर कॉंलेजतर्फ़े एक सेमीनार ठेवला होता. काही निवडक मुल-मुली वेगवेगळ्या कॉलेजमधुन आली होती. पहिल्या दिवशी बाहेरच एक मुलींचा घोळका दिसला होता. तेव्हा पहिली नजरानजर झाली होती. पुढे ५० मुलाम्चे १०-१० चे ग्रुप झाले होते. तेव्हा दोघे एका ग्रुप मध्ये नव्हते. त्यामुळ्ये त्यांची जास्त ओळख नव्हती. ८ते६ वेळ असल्यामुळे, खुपच वेळ एकत्र जाऊ लागला. ग्रुप मध्ये ओळखी वाढल्याने टिगंल-टवाळी करायचे, पण अभ्यासामध्ये सिरीयस होती. राहुलची प्रत्येक विषयावर सदोदित बडबड चालु असायची. लोकसभा निवडणुका असु दे, नाहीतर एखादा चित्रपट कोणत्या गाण्यामुळे चालेल आणि कोणत्या सीनमुळे पडेल. तेव्हा रेडिओ २४ तास नव्हता, त्यामुळे ह्याला टोपण नाव पडले होते ’आर.जे.’( रेदिओ जॉकी) परंतु त्याचे नाव राहुल जोशीच होते.=आर.जे प्रिया चागंले मार्क घेऊन आलेली, टॉपर वगैरे होती. दोघी-तिघी मैत्रिणीबरोबर असायची. कोणाबरोबर बोलणे नाही, काही नाही यायची आणि जायची. क्लास मध्ये कोणी विचारले तरच उत्तर देणे, त्यांच्या ग्रुपमध्ये ’बोरच’ होती. एका सकाळी श्री. दगडुशेटच्या मंदिरात राहुल गेला असता, पाठमोरी ती दिसली म्हणजे गुलाबी पंजाबी ड्रेस मधील मुलगी! प्रियाचा टापटिप पणा फ़ारच होता. आठवड्याचे सातही ड्रेस वेगवगळे असायचे. सण असेल तर अजुन वेगळा. मेक-अप असा कधी नाही, निसर्गात:च सुदंर गौर गौर कातींची असल्यामुळे ब्युटी पार्लरचा खर्च वाचला होता. तो पुढे गेला देवाला नमस्कार केला. तर डाव्या बाजुला प्रियाच होती.
लागला तर स्व:ताहुन तिने ओळख दिली आणि आश्चर्याने विचारले," इकडे कसा काय?"त्यावर तो उत्तरला,"आज अगांरकी आहे आणि पुण्यात आलो कि मी नेहमीच येतो. कॉफ़ी घेणार का? समोर साबुदाणा वडे चागंले मिळतात. ती म्हणाली," माझा निरकांर आहे!"

आता थोडीफ़ार सर्वाचीं एकमेकानां ओळख झाली होती.
५० जणांचाच एक ग्रुप झाला होता. नेमकी यावेळी, सरांनी १०-१० जणाचे ग्रुप वेगवेगळे केले. आता राहुल आणि प्रिया एकाच ग्रुपमधे आले. आता मात्र हा अबोल झाला. दहा दिवसानतंर रिपोर्ट द्यायचा होता, नतंर सर्व वेगवेगळे होणार होते. आता प्रत्येकजण पुढे काय करणार? याची चर्चा झडली. राहुलची प्लेसमेन्ट झाली होती. प्रिया एम.बी,ए करणार होती. तिचे ऍडमिशन पण झाले होते. राहुलने विचारले,"मग हा सेमीनार का गेला?"
"दोन महिने मोकळा वेळ होता. तेवढीच ज्ञानात भर."
"पर्सनल विचारतो?" "विचार !"
"तु आठवड्याला प्रत्येक दिवशीचा रगं ठरवुन ड्रेस निवडते?"
ती ओशाळली, पण सावरली. तिला वाटले एवढे निरीक्षण मैत्रीण पण करत नाहीत. ह्याने कसे ओळखले.
ती म्हटली,"हो !"
तेव्हा पासुन ह्याच्या स्कार्फ़चा रगं पण ’गुलाबी’.
एका कर्कश होर्नने हा भानावर आला. गेटवरील नजर हळुच मानेभोवती गुलाबी स्कार्फ़वर गेली. योगायोगने आज मगंळवार होता.मनात विचार आला
’४ वर्षानी ते सुहास्य पुन्हा दिसेल?’
सकाळी घरातुन निघतना नेहमी प्रमाणे, आईच्या पायापडुनच निघाला होता. मुड काय असा तसा होता.आईला म्हटला," आज अपोइन्टमेट आहे." थोडक्यात
आज रात्री उशीर होईल. पण मन बैचेन होते म्हणुन ४लाच ऑफ़िसमधुन निघाला. वाहनांची गर्दी जास्त होती, सिग्नल मिळाल्यानतंर, डाव्याबाजुने निघाला.




बसस्टॉपवर त्याला एक ओळखीची व्यक्ती दिसली. त्याने गाडीचा वेग कमी केला आणि प्रियाच ती...
नेहमी प्रमाणे ओढणी ऎवजी पदर व्यवस्थीत करुन त्याच्याकडे तीने बघीतले. ह्याने स्कार्फ़ चेहऱ्यावरुन काढला एक स्मित हास्य दिले...
पण...

पण मागील कर्कश हॉर्न देणाऱ्या गाडीने एक जोरदार धडक दिली. हा रस्त्याच्या कडेला पडला. नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी झाली, कोणी पुढे येईना. एक मारुतीवाला पुढे आला, एव्हाना प्रियाही आली, म्हणाली," मी यांना ओळखते, त्यांना आपण गाडीमधुन हॉम्स्पीटलमध्ये नेऊ."
मारुतीचा मालक,"हो, गाडी वळवुन सचेंतीला नेऊ, ध्ररा ह्यानां ’
प्रियाने स्कार्फ़ने डोक्यावरील जख्म बांधुन डोके मांडीवर घेतले. स्कार्फ़ व साडी दोन्ही रक्ताळले. दोन्ही गुलाबीच होथे, आज मगंळवार होता...
आज कधी नव्हे, ते राहुल काही बोलु इच्छित होता. सेमीनारमध्ये न विचारलेले...,
सर्वानां माहित होते हा कविता करतो. गेट-टुगेदरमध्ये वाचनही केले होते. शेवटच्या दिवशी प्रिया गेटवरुन जाताना त्याचे काळीज चिरर.. झाले होते. पुन्हा भेट होईल का नाही. त्याने काही विचारले नव्हते. कारण ती पुढील ४ वर्ष तरी लग्न करणार नव्ह्ती.
...आणि याचे अजुन लग्न झाले नव्हते. तिने तेव्हा पण काही सागींतले नाही, पण राहुलने स्पष्ट केले होते, जर ती नाही म्हणाली तर हा २ वर्षतरी मुलगी बघणार नाही. तो तिच्यावरील प्रेमाला एकतर्फ़ी जागणार होता.

थोडीशी शुद्ध आली तेव्हा त्याने तिच्याकडे कटाक्ष टाकला, आर्जवाने म्हणाला,

आता तरी माझ्यावर प्रेम करशील ना...
अतं समय आला जवळ,
आता तरी दोन अश्रु ढाळशील ना...

समजुन-उमजुन सर्व झाले,
आता माझे गात्रही थकले,
आता तरी क्षमा करशील ना...!१
सहवासात नाही, रुसव्यात क्षण गेले,
सगंतीत असुन, पण नेहमीच दुर राहिले,
आता अतिमं विसाव्य्राला,
थोडा वेळ सोबत देशिलना...!१
एकत्र चालताना,
खाचखळग्यातुन जाताना,
ठेचाळताना पडताना,
सावरायलाही वेळ नव्हता,नाही बोलायला,
आता तरी शेवटी माझ्याकडे बघायला
सवड तुला मिळेलना...!३
सर्वच संपले,
जीवनही आटले,
प्रेमाचे भरते,
कधीच नाही आले,
तरी माझी आठवण येईल ना...!४
आता तरी माझ्यावर प्रेम करशील ना...

नेहमी प्रमाणे ती अबोलच होती. तिच्याजवळ उत्तर असुन पण ती देऊ शकत नव्हती.
शेवटी नियतीच तिच्या मदतीला आली,
सचेंतीकडे वळताना एक मोठा खड्डा आला,
गाडी जोरात हेळकाडंली,
पदरात लपवुन टेवलेले ’मगंळासुत्र’
राहुलच्या चेहऱ्यावर आले.

आणि एक जुलूस विसावला... :-(