ह्यो दादा त्या ताईचा
ती ताई ह्या दादा ची
दोघांची गट्टी
कॉलेजच्या कटट्यावरती॥१॥
ह्यांच सी.आर.शी जमतं
हिची ओळख मास्तरशी
त्यामुळे दोघ फ़िरतात
कॉलेजच्या बागे भोवती
ह्यो दादा...॥२॥
हुशार मुलांची ह्यांची दोस्ती
ते मरतात अभ्यास करुनी
ह्यांची मात्र दिवाळी
ह्यो दादा...॥३॥
तरी मला बर वाटतं,
ह्यो दादा त्या ताईचा
ती ताई ह्या दादा ची
...आमची मात्र कोणाला फ़िकर नाही ॥४॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment